लॉकडाऊन दरम्यान प्रवासाची परवानगी मागणाऱ्या दोन लाख अर्जांना मंजूरी


मुंबई : 20 एप्रिलपासून राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अंशत: शिथिलता देण्यात आली असून त्यातच पोलिसांकडे मोठ्या संख्येने राज्यातील राज्यात प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी अर्ज आले होते. अशा दोन लाख अर्जांना आतापर्यंत राज्यातील राज्यात प्रवासासाठी परवानगी देण्यात आली असून तर विविध कारणासाठी प्रवासाच्या परवानगीसाठी 70 हजार अर्ज प्रलंबित आहेत. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

एके ठिकाणाहून दुसरीकडे जायला आपल्याच राज्यात परवानगी मागावी लागेल असे कधी कुणाला वाटले नसेल, पण ती वेळ सध्या कोरोनामुळे आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली आहे. पण लॉकडाऊन एवढा वाढेल याची कल्पना नसल्याने अनेक जण आहेत त्याच ठिकाणी अडकले. आपल्या मुला-बाळांना गावाला पाठवले होते.

पालकांनी आपल्या मुलांना परीक्षा रद्द झाल्याने आजोळी पाठवले होते. तर कामासाठी कोणी शहराबाहेर गेले होते. शहरात कोणी काम करते आणि कुटुंबिय गावात अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे किमान राज्यातील राज्यात प्रवास करण्याची परवानगी द्यावी, यासाठी पोलिसांकडे मोठ्या संख्येने अर्ज आले होते.

अशा दोन लाख अर्जांना आतापर्यंत राज्यातील राज्यात प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा पातळीवरील प्रशासनाला ही परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मेडिकल इमर्जन्सी आणि घरात कुणाचे निधन झाले असल्यास या कारणासाठी फक्त पोलीस प्रवासासाठी परवानगी देत आहे. मात्र विविध कारणासाठी प्रवासाच्या परवानगीसाठी 70 हजार अर्ज प्रलंबित आहेत.

अतिमहत्त्वाच्या कारणांसाठी सरकार काही जणांना अटींसह प्रवासाची परवानगी देत आहे. त्यानुसार आतापर्यंत दोन लाख अर्जांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. पण अजूनही प्रवासाच्या परवानगीसाठी 70 हजार अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकार यावर कोणता निर्णय घेणार हे पाहावे लागेल.

Leave a Comment