जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 24 लाख पार; 1.65 लाख लोकांनी गमावला जीव


नवी दिल्ली : जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 24,06,823 पार पोहचला असून आतापर्यंत 1,65,054 लोकांनी आपला जीव गमावला आहे. वल्डोमीटर या संकेतस्थळाने जारी केलेल्या जगभरातील आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये 7,63,832, स्पेनमध्ये 1,98,674, इटलीमध्ये 1,78,972, फ्रान्समध्ये 1,52,894 लोक कोरोनाबाधित आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेमध्ये 40,553, स्पेनमध्ये 20,453, इटलीमध्ये 23,660, फ्रान्समध्ये 19,718, चीनमध्ये 4,632 लोकांचा मृत्यू झाला आहे.

40 हजार बळींचा आकडा अमेरिकेने ओलांडला असून अमेरिकेत गेल्या 24 तासात 1534 कोरोनाबाधितांचा बळी गेला असून आतापर्यंत तेथे 40 हजार 548 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या सात लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत एकट्या न्यूयॉर्क प्रांतात 627 बळी गेले आहेत. तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 लाख 47 हजार तर एकूण मृतांचा आकडा 18,298 वर पोहोचला आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 4202, मिशिगनमध्ये 2391, मासाचुसेट्स 1706, लुझियाना 1296, इलिनॉईस 1290, कॅलिफोर्निया 1175, पेनसिल्वानिया 1237, कनेक्टिकट 1127 आणि वॉशिंग्टनमध्ये 629 लोकांचा बळी घेतला आहे.

आतापर्यंत युरोपमध्ये 1,01,493 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11,53,148 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिका आणि कॅनडा मिळून 7,68,670 रूग्ण समोर आले आहेत. तर 40 हजारांहून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आशिया खंडामध्ये 1,62,256 रूग्ण आणि 6951 लोकांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम आशिया खंडामध्ये 1,22,819 रूग्ण आणि 5,559 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेव्यतिरिक्त कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव स्पेन, इटली, इंग्लंड आणि फ्रान्समध्येही पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासात स्पेनमधील 410 लोकांनी जीव गमावले. तर तेथील मृतांचा आकडा 20 हजार 453वर पोहोचला आहे. इटलीत काल कोरोनाने 433 माणसांचा बळी घेतला. तर आता इटलीतील एकूण बळींची संख्या 23 हजार 660 वर पोहोचली आहे. काल रुग्णांची संख्या तीन हजारांनी वाढली असून इटलीत आता जवळपास 1 लाख 79 हजार रुग्ण आहेत. तसेच इंग्लडमध्येही कोरोनाने हैदोस घातला आहे. काल 16 हजार बळींचा आकडा इंग्लंडने ओलांडला असून काल दिवसभरात 596 लोकांनी जीव गमावल्यामुळे इंग्लंडमधील बळींचा आकडा 16,060 वर पोहोचला आहे. फ्रान्समध्येही कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळतो. फ्रान्सने काल दिवसभरात 395 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत19 हजार 718 बळी गेले असून एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 53 हजार वर पोहोचला आहे.

काल जर्मनीत 104 बळी गेले असून एकूण बळींची संख्या 4642 वर पोहोचली आहे. बळींच्या संख्येत इराणमध्ये काल 87 ची भर पडल्यामुळे इराणमधील एकूण मृतांचा आकडा 5118 वर पोहोचला आहे. तर कोरोना बाधितांची संख्या 82211 वर पोहोचली आहे. कोरोनाने बेल्जियममध्ये काल 230 मृत्यूमुखी पडले असून एकूण बळींचा आकडा 5683 वर पोहोचला आहे. हॉलंडमध्ये काल 83 बळी घेतले तिथे एकूण 3684 लोक दगावले आहेत. टर्की 2017, ब्राझील 2462, स्वित्झर्लंडने 1393, स्वीडनमध्ये 1540, पोर्तुगाल 714, कॅनडात 1587, इंडोनेशिया 582, तर इस्रायलमध्ये 172 बळी घेतले आहेत. दक्षिण कोरियात काल 2 मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा 234 वर पोहोचला आहे. आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानात रुग्णांची संख्या 8348 वर पोहोचली आहे, तिथे 168 लोकांचा बळी घेतला आहे. कोरोनाने गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 75471 तर बळींच्या आकड्यात 4957 ची भर पडली.

Leave a Comment