राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4200 पार


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4200 वर पोहोचला असून राज्यात काल दिवसभरात 552 कोरोनाग्रस्तांची नव्याने नोंद झाली. यात सर्वाधिक 132 जण कोरोना पॉझिटिव्ह मुंबईत सापडले आहेत. त्याखालोखाल पुण्यात 49 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण संख्येपैकी 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर काल दिवसभरात 12 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यातील सहा मृत्यू हे मुंबईत, चार मालेगाव आणि सोलापूर मनपा आणि अहमदनगर येथील जामखेडमधील प्रत्येकी एक आहे. दरम्यान एकाच दिवशी साडे पाचशे जणांना कोरोनाची लागणी होणे, ही राज्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे.

राज्यात काल 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी मुंबई येथील 6 आणि मालेगाव 4 तर 1 मृत्यू सोलापूर मनपा आणि 1 मृत्यू अहमदनगर जामखेड येथील आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 72,023 नमुन्यांपैकी 67,673 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 4200 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट योजना अंमलात आणण्यात येणार आहे. राज्यात सध्या 368 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 6359 सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी 23.97 लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केलं आहे. आजपर्यंत 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 87,254 लोक होम क्वॉरंटाईन असून 6743 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

Leave a Comment