कुठूनही घुसू शकतो कोरोना; पाक मंत्र्याचा विचित्र सल्ला

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य अधिकारी सोशल डिस्टेंसिंग, वारंवार हात धुवणे, फेस मास्क वापरणे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन करत आहे. या सुचनांचे पालन केल्याने कोरोनाचे संक्रमण होणार नाही, असे सांगितले जाते.

मात्र जगभरात असे अनेक लोक आहेत, जे व्हायरसचे संक्रमण टाळण्यासाठी विचित्र उपाय सुचवत असतात. पाकिस्तानच्या पत्रकार नायला इनायत यांनी असाच एक डॉ. फिरदौस आशिक अवान यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. फिरदौस या पाकिस्तानच्या सूचना आणि प्रसारण मंत्री आहेत.

नायला यांनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहिले की, फिरदौस यांचे म्हणणे आहे की व्हायरस खालून देखील घुसू शकतो.

फिरदौस यांच्या या विचित्र सल्ल्यावरून लोख त्यांची खिल्ली उडवत आहेत. त्यांनी दिलेला सल्ला पुर्णपणे चुकीचा असून, डब्ल्यूएचओ अथवा कोणत्याही आरोग्य संघटनेने याबाबतची पुष्टी केलेली नाही.

व्हिडीओमध्ये फिरदौस म्हणत आहेत की, तुमचे शरीर असो, पाय असो, ते देखील सुरक्षित असायला हवे. एवढेच नाहीतर चेहऱ्याला सुरक्षित केल्यास व्हायरस खालून येईल. या गोष्टी तुम्हाला सोबत हातळायच्या आहेत. हे देखील एक मेडिकल सायन्स असून, आपल्या सर्वांना मिळून काम करायचे आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत 85 हजारांपेक्षा अधिक जणांनी व्हिडीओ पाहिला आहे. युजर्स व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment