कोरोना : भरपाईसाठी जर्मनीने चीनला पाठवले तब्बल 149 बिलियन यूरोचे बिल

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. 200 पेक्षा अधिक देश या व्हायरसच्या विळख्यात सापडले असून, यामुळे लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला देखील बसत आहे.

जगभरातील अनेक देश कोरोनाला चीनचे षडयंत्र असल्याचे म्हणत आहे. अमेरिकेने चीनला धमकी दिली असून, आता जर्मनीने थेट चीनकडून नुकसान भरपाई मागितली आहे.

जर्मनीने देखील कोरोना व्हायरस पसरण्यासाठी चीनला जबाबदार धरले आहे. इतर देशांप्रमाणेच जर्मनीत देखील कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता हे नुकसान चीनने भरून द्यावे अशी मागणी जर्मनीने केली आहे.

जर्मनीने चीनला 149 बिलियन यूरोचे बिल पाठवले आहे. जेणेकरून कोरोना व्हायरसमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई होईल. यात 27 बिलियन यूरो पर्यटनामुळे झालेले नुकसान, 7.2 बिलियन यूरो चित्रपट सृष्टी, जर्मन एअरलाईन्स आणि छोट्या उद्योगांमुळे 50 बिलियन यूरोचे नुकसान झाल्याचे बिल जर्मनीने चीनला पाठवले आहे.

जर्मनीने नुकसान भरपाईसाठी बिल पाठवले असताना, अमेरिका तपास टीम पाठवण्याच्या तयारीत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीन अमेरिका आणि यूरोपमधील देशांच्या निशाण्यावर आला आहे. चीनच्या लॅबमधून कोरोना व्हायरसची निर्मिती झाली आहे का, याचा तपास अमेरिका करणार आहे.

Leave a Comment