कोरोना : दक्षिण कोरिया भारताला पाठवणार 5 लाख टेस्ट किट

कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभुमीवर दक्षिण कोरियाची राजधानी सिओल येथील भारतीय दुतावास आणि मेसर्स ह्युमेसिस लिमिटेडमध्ये इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआर) 5 लाख चाचणी किट पाठवणार असल्याचा करार झाला आहे. भारत आणि दक्षिण कोरियाचा कोव्हिड-19 चा सामना करण्यासाठी ही महत्त्वपुर्ण भागीदारी आहे.

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या भारतात कोरोनाबाधितांची संख्या 17 हजारांच्या पुढे गेली आहे. अशा स्थितीमध्ये भारताला अधिकाधिक चाचणी किटची आवश्यकता आहे. त्यामुळे दक्षिण कोरियासोबत झालेला हा करार महत्त्वपुर्ण ठरणार आहे.

याआधी चीनने देखील भारतात मोठ्या प्रमाणात चाचणी किट, पीपीई किट पाठवले आहेत.

Leave a Comment