देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 17 हजारांवर, 543 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : दिवसेंदिवस देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून यासंदर्भात आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 17 हजारावर गेली आहे. सध्या देशातील 17 हजार 265 जणांना कोरोनाची लागण झाली असून 543 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2301 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात एका दिवसात 1334 कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळले आहे.

भारतात रुग्ण बरे होण्याचा आकडा 14.19 टक्के आहे. तर देशात 23 राज्य अशी आहेत ज्या राज्यात मागील 10 दिवसात आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, देशामध्ये कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये 70, गुजरातमध्ये 58, दिल्ली 43, तेलंगणा 18, आंध्रप्रदेश 15, कर्नाटक 14, उत्तर प्रदेशमध्ये 17, पंजाब 16, पश्चिम बंगाल 12, राजस्थान 11, जम्मू कश्मिर 5, हरियाणा 3, केरळ 3, झारखंड 2, बिहार, आसाम, हिमाचल आणि ओडिसा मध्ये प्रत्येत एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचे सर्वाधिक 4200 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीमध्ये 1 हजार 893 रुग्ण आणि मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर असून त्याठिकाणी 1 हजार 407 रुग्ण आढळले आहेत.

याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल म्हणाले, लक्षणविरहीत कोरोना पाझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या जास्त नाही. परंतु तरीही जे कोरोनाबाधित क्षेत्र आहे तिथे टेस्ट केली जात आहे. आयसीएमआरचे अध्यक्ष गंगाखेडकर म्हणाले, देशात आतापर्यंत 3 लाख 86 हजार 791 टेस्ट करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment