लॉकडाऊनमध्ये फिरणाऱ्याला पोलिसांनी दिली हटके शिक्षा

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊन आहे. अशा स्थितीमध्ये देखील काहीजण विनाकारण बाहेर फिरताना आढळतात. अशाच एका बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीला उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी पकडले. बाईक जप्त करणार असल्याचे सांगितल्यावर मात्र व्यक्ती घाबरला. यानंतर पोलीस अधिकाऱ्याने त्याला अशी शिक्षा दिली की सर्वचजण त्यांचे कौतूक करत आहे.

उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे पोलिसांनी एका दुचाकी चालकाला पकडले. पोलिसांनी या व्यक्तीला शिक्षा म्हणून चक्क आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याची शिक्षा दिली. सोबतच तीन अन्य लोकांनी देखील हे अ‍ॅप डाऊनलोड केले पाहिजे, तरच सोडले जाईल असे सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या या हटके शिक्षेची सध्या चर्चा होत आहे. ट्विटरवर अनुपम पांडे या युजरने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओला आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले असून, शेकडो युजर्सनी या प्रतिक्रिया दिली आहे. नेटकरी पोलिसांच्या या हटके अंदाजाचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment