कोरोना : 99 वर्षीय विश्वयुद्धात सैनिक असलेल्या व्यक्तीने उभारला कोट्यावधींचा निधी

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी जगभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. द्वितीय विश्वयुद्धाचा भाग असलेले ब्रिटनचे 99 वर्षीय कॅप्टन टॉम मुर्रे यांनी देखील कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आपल्या बगीचामध्ये 100 फेऱ्या मारत टॉम यांनी 29 मिलियन डॉलर (जवळपास 220 कोटी रुपये) निधी जमा केला असून, ही रक्कम ते आरोग्य सेवेला देणार आहेत.

उत्तर इंग्लंडमधील हार्रोगेट येथील कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या नाइटँगल हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी व्हिडीओद्वारे टॉम कर्मचाऱ्यांचे कौतूक करणार आहेत. द्वितीय विश्वयुद्धाचे नायक असलेले टॉम यांनी आपले चॅलेंजपुर्ण करत 29.21 मिलियन डॉलर जमा केले आहेत.

या संदर्भात टॉम म्हणाले की, हॉस्पिटल सुरू करणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. या कठीण परिस्थितीत देखील ब्रिटनमधल्या नागरिकांनी दयाळूपणा आणि औदार्य दाखवत दिलेली एवढी रक्कम पाहून खरचं चकित होते.

टॉम यांनी आपल्या 30 एप्रिलला 100 व्या वाढदिवसानिमित्ताने वॉकिंग फ्रेमच्या मदतीने 25 मीटर भागात 100 फेऱ्या मारण्याचे आवाहन स्वतःसमोर ठेवले होते. त्यांचे मुख्य लक्ष्य 1000 पाउंड जमा करण्याचे होते, मात्र माध्यमांमुळे ते चर्चेत आले व मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला.

ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिमॉन स्टिव्हन्स यांनी देखील या मदतीसाठी टॉम यांचे आभार मानले.

Leave a Comment