कोरोना : या देशातील मुली कार पार्ट्सपासून बनवत आहेत वेंटिलेटर

अफगाणिस्तानमध्ये एका रोबॉट डिझायनिंगच्या एका मुलींच्या समुहाने कमी खर्चात मेडिकल वेंटिलेटर बनविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी कारमध्ये वापरले जाणारे पार्ट्सचा वापर केला. देशातील कोरोनाग्रस्तांसाठी कमी पैशात सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.

या मुलींच्या गटानुसार, जर सरकारने त्यांच्या प्रोटोटाइपला मंजूरी दिली तर त्याची किंमत 300 डॉलर (जवळपास 23 हजार रुपये) असेल. सर्वसाधारण वेंटिलेटरची किंमत  30 हजार डॉलर (जवळपास 23 लाख रुपये) आहे.

मुलींचा हा गट अफगाणिस्तानच्या स्थानिक हेल्थ स्पेशॅलिटी आणि हॉवर्ड यूनिव्हर्सिटीच्या तज्ञांसोबत काम करत आहे. या गटातील रोया महबूब म्हणाल्या की, मुली मेसाच्युसेट्सच्या तंत्रज्ञान संस्थेच्या एका डिझाईनवर काम करत आहेत.

हेरातच्या पश्चिम शहरात राहणाऱ्या या 14 ते 17 वयोगटातील मुली ‘अफगान ड्रीमर्स’ म्हणून प्रसिद्ध आहेत. 2017 मध्ये या मुलींच्या गटांनी वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या रोबॉटिक्स स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिल्यानंतर चर्चेत आल्या होत्या.

हेरातमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर गव्हर्नरने लोकांना वेंटिलेटरसाठी डिझाईन तयार करण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून या मुली अफगाणिस्तानच्या रस्त्यावरील कारच्या इंजिन आणि बॅटरी पार्ट्सचा वापर या वेंटिलेटर्सच्यी निर्मितीसाठी करत आहेत. अफगाणिस्तानची लोकसंख्या 35 मिलियन असून, त्यांच्याकडे केवळ 300 वेंटिलेटर्स आहेत.

अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्या वाहिदुल्लाह मेयर म्हणाल्या की, आम्ही या मेहनती मुलींच्या वेंटिलेटर बनविण्याच्या प्रयत्नांचे कौतूक करतो आणि त्यांना प्रोत्साहान देतो. तज्ञ आणि इंजिनिअर्सना मुलींची मदत करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment