कोरोनाला रोखण्यासाठी सॅमसंगने आणले ‘हँड वॉश’ अ‍ॅप

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी हँड वॉश अ‍ॅप तयार केला आहे. हे अ‍ॅप गॅलेक्सी वॉच युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. हँड वॉश अ‍ॅपमध्ये युजर्सला वेळोवेळी हात धुण्याचे रिमाइंडर मिळेल. याशिवाय हात धुतल्यानंतर युजर्सला या अ‍ॅपद्वारे फीडबॅक देखील मिळेल.

या अ‍ॅपला जागतिक आरोग्य संघटनेचे दिशानिर्देश लक्षात घेऊन बनविण्यात आले आहे. आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार वारंवार कमीत कमी 20 सेकंद हात धुवणे गरजेचे आहे.

सॅमसंगचे हे नवीन अ‍ॅप युजर्सला वेळोवेळी हात धुण्याची आठवण करून देते. ज्यामुळे युजर्स व्हायरसच्या धोक्यापासून वाचू शकतील. या अ‍ॅपमध्ये युजर्स आपल्या सोयीनुसार रिमाइंडर सेट करू शकतात.

सॅमसंगने या अ‍ॅपमध्ये 25 सेकंदांचा टायमर दिला आहे. ज्यात 5 सेकंद साबण लावण्यासाठी आणि इतर 20 सेकंद हात धुण्यासाठी आहेत.

दरम्यान, सॅमसंगने कोरोना व्हायरसच्या लढ्यात मदत म्हणून पीएम केअर्स फंडमध्ये 15 कोटी रुपये आणि उत्तर प्रदेश, तामिळनाडू सरकारला 5 कोटी रुपये दान केले होते. सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांनी देखील आपले व्यक्तीगत योगदान दिले आहे.

Leave a Comment