कोरोना : मरकजची किंमत संपुर्ण दिल्लीला चुकवावी लागली- केजरीवाल

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढला आहे. मार्च महिन्यात दिल्लीत पार पडलेल्या मरकजच्या कार्यक्रमामुळे देशभरात कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे. यावर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली असून, दिल्लीने तबलिगी जमातीच्या या कार्यक्रमाची किंमत चुकवली असल्याचे म्हटले आहे.

केजरीवाल पत्रकार परिषदेत म्हणाले की, दिल्लीने मरकज कार्यक्रम आणि परदेशी पर्यटकांची मोठी किंमत चुकवली आहे. याशिवाय सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची दिल्लीतील संख्या वाढत असून, चाचणीचे प्रमाण वाढवले आहे. काल 736 प्रकरण समोर आली असून, त्यातील 186 जण पॉझिटिव्ह आहेत. तर 186 जणांमध्ये कोणतेही लक्षण नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब असून, लोकांना लक्षण आहेत की नाही हे देखील लक्षात येत नाही. असे केजरीवाल म्हणाले.

हे 186 जण दिल्ली सरकारच्या वतीने स्वयंसेवक म्हणून अन्न वाटपाचे काम करत असे. रॅपिड टेस्टिंगची परवानगी दिली आहे. याशिवाय दिल्लीमध्ये कोणत्याही प्रकारची लॉकडाऊनमध्ये सुट देण्यात आलेली नाही. एक आठवड्यानंतर परिस्थिती सुधारल्यानंतर पुनरावलोकन करून लॉकडाऊनमध्ये सुट द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.

Leave a Comment