‘उन्हात नष्ट होतो कोरोना’ – अमेरिकेत प्रयोग; मात्र अंतिम परिणाम येणे बाकी

अमेरिकन सरकारच्या होमलँड सिक्युरिटी विभागाच्या एका प्रयोगात समोर आले की उन्हात कोरोना व्हायरस खूप लवकर नष्ट होतो. मात्र हे प्रयोगाचे सुरुवातीचे परिणाम असून, प्रयोगाचे अंतिम परिणाम येणे बाकी असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

याआधी देखील वैज्ञानिकांचे म्हणणे होते की अधिक तापमानात कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होतो अथवा नष्ट होतो. मात्र अधिकृतरित्या याबाबत पुष्टी झालेली नाही.

होमलँड सिक्युरिटी विभागाच्या प्रयोगात समोर आले की उच्च तापमान अथवा अधिक दमटपणामध्ये कोरोना व्हायरस अधिक काळ जिंवत राहत नाही.

प्रयोगानुसार, दिवसाच्या उन्हात बाहेरील वस्तूंच्या पृष्ठभागावरील कोरोनाच्या संक्रमणाचा धोका कमी होता. उन्हात व्हायरस लवकर नष्ट झाला. ज्या जागेवर तापमान कमी असते, तेथे कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

होमलँड सिक्युरिटी विभागाचे प्रवक्ते म्हणाले की, विभाग कोरोनाच्या विरोधातील लढाईत काम करत आहे. मात्र त्यांनी लीक झालेल्या कागदपत्रांविषयी काहीही माहिती दिली नाही.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी फ्रान्सच्या एक्स-मार्सेलिई यूनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या प्रयोगात समोर आले होते की 60 डिग्री सेल्सियस तापमानात व्हायरसचा प्रभाव काही प्रमाणात कमी होतो, मात्र अधिक तापमानात देखील संक्रमण होतच राहते.

Leave a Comment