कोरोना : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सीएसआयआरने तयार केला खास सुट

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळेने (सीएसआयआर-एनएएल) बंगळुरू येथील एमएएफ क्लोथिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत मिळून कोरोनाविरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खास सुरक्षा कवच तयार केले आहे.

अनेक थर असणारे पॉलीप्रोपलिलिन स्पून लॅमिनेटेड सिंथेटिकद्वारे बनविण्यात आलेले कवच आरोग्य कर्मचाऱ्यांना संक्रमणापासून लांब ठेवेल. हे सुट कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, इतर कर्मचाऱ्यांना 24 तास सुरक्षित ठेवेल.

डॉ. हरीश सी बरशिलिया आणि डॉ. हेंमत कुमार शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील सीएसआयआर-एनएएलच्या टीमने पुर्णपणे स्वदेशी साम्रगी नवीन पद्धतीने प्रक्रियाकरून याची निर्मिती केली आहे. चाचणीमध्ये पास झाल्यानंतर याच्या निर्मितीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या सुटचे उत्पादन वाढवण्याची योजना असून, सध्या एका महिन्यात 30 हजार सुटची निर्मिती केली जाईल.

सीएसआयआरी-एनएएलचे संचालक जितेंद्र जे जाधव म्हणाले की, या सुटची खास गोष्ट म्हणजे हे या सारख्या अन्य कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आणि विश्वसनीय आहे.

Leave a Comment