जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात धक्कादायक वाढ


नवी दिल्ली : जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः हैदोस घातला असून या कोरोना व्हायरसमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या 1 लाख 60 हजारांवर गेली आहे. जगभरात आतापर्यंत या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे 160731 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर कोरोना पीडितांची संख्या 23 लाख 31 हजारांवर पोहोचली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे. तेथील सहा लाख रुग्ण बरे झाले आहेत तर अद्याप जवळपास पावणे सोळा लाख लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 55 हजार 265 गंभीर आहेत.

39 हजार बळींचा आकडा अमेरिकेने ओलांडला असून अमेरिकेत कोरोनामुळे गेल्या 24 तासात १,८६७ बळी गेले आहेत. अमेरिकेत एकूण बळी ३९ हजार १४ झाले आहेत. तर कोरोनाबाधितांची संख्या सात लाख ३९ हजारांवर पोहोचली आहे. काल एकट्या न्यूयॉर्कमध्ये 540 बळी गेले. तिथे रुग्णांची संख्या 2 लाख 41 हजार तर एकूण मृतांचा आकडा 17671 एवढा आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 4070, मिशिगनमध्ये 2308, मासाचुसेट्स 1560, लुझियाना 1267, इलिनॉईस 1259, कॅलिफोर्निया 1147, पेनसिल्वानिया 1102, कनेक्टिकट 1086 आणि वॉशिंग्टनमध्ये 624 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे.

गेल्या चोवीस तासात स्पेनमधील 637 लोकांनी आपले जीव गमावले असून तेथील मृतांचा आकडा 20 हजार 639वर पोहोचला आहे. तर इटलीत काल कोरोनामुळे 482 नागरिकांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या 23 हजार 227 एवढी झाली आहे. काल रुग्णांची संख्या साडे तीन हजारांनी वाढली, इटलीत आता जवळपास 1 लाख 76 हजार रुग्ण आहेत. काल दिवसभरात इंग्लंडमधील 888 लोकांनी आपला जीव गमवाला असून तेथील बळीचा आकडा 15464 वर पोहोचला आहे.

काल दिवसभरात फ्रान्समधील 642 लोकांचा कोरोनाने जीव घेतला. तिथे आत्तापर्यंत 19 हजार 323 नागरिकांचे बळी गेले आहेत. तेथील एकूण रुग्ण 1लाख 51 हजार एवढे आहेत. जर्मनीत काल १८६ बळी गेले, एकूण बळींची संख्या ४,५३८ एवढी झाली आहे. तर इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल ७३ ची भर पडली आहे तर एकूण ५,०३१ मृत्यू झाले आहेत. रुग्णांची संख्या ८०,८६८ एवढी झाली आहे. कोरोनाने बेल्जियममध्ये काल २९० मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा ५,४५३ वर पोहोचला आहे. हॉलंडमध्ये काल १४२ बळी घेतले तिथे एकूण ३,६०१ लोक दगावले आहेत.

टर्की १८९०, ब्राझील २३६१, स्वित्झर्लंडने १,३६८, स्वीडनमध्ये १५११, पोर्तुगाल ६८७, कॅनडात १४७०, इंडोनेशिया ५३५, तर इस्रायलमध्ये १६४ बळी कोरोनामुळे गेले आहेत. दक्षिण कोरियात काल २ मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा २३२पोहोचला आहे. आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या ७,६३८ वर पोहोचली आहे. तिथे कोरोनाने 143 लोकांचा बळी घेतला आहे. गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ८१,२८७ तर बळींच्या आकड्यात ६,५०५ ची भर पडली आहे.

Leave a Comment