मुंबईकरांच्या चिंतेत भर, सात अतिगंभीर वार्डमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ


मुंबई : दोन हजाराच्या पार एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा गेल्याने चिंता वाढली आहे. 389 वर ‘जी दक्षिण’ वॉर्डमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला आहे. मुंबईतील सात वॉर्डमध्ये आतापर्यंत प्रत्येकी 110 पेक्षाही जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दरम्यान, जी दक्षिण वार्डमधील रुग्ण संख्या 16 एप्रिलपर्यंत 388 होती. 17 एप्रिलला ही संख्या 389 वर पोहोचली.


किमान 110 कोरोनाग्रस्त जी दक्षिण, ई, जी उत्तर, डी, के पश्चिम, एल, एच पूर्व या प्रत्येक वॉर्डमध्ये आहेत. कालपर्यंत मुंबईतील ई वार्डमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 172 होता. पण हा आकडा आता 194 वर पोहोचला आहे. तर जी उत्तर या वार्डमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 123 होती. हा आकडा 142 वर पोहोचला आहे. मुंबईत ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण सापडलेल्या प्रभागाप्रमाणे 17 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेने नकाशा जारी केला आहे. 2085 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी सर्वाधिक ‘जी दक्षिण’मध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येथील आकडेवारी सर्वाधिक राहिली आहे.

Leave a Comment