विरुष्काचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियात होत आहे व्हायरल


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा नवरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बाकीच्या सेलिब्रिटीप्रमाणे सध्या लॉकडाऊनचे पालन करत आहेत आणि एकमेकांसोबत घरीच वेळ घालवत आहेत. दोघेही नियमित अंतराने सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ पोस्ट करत आहेत आणि लोकांना कोरोनाव्हायरसच्या प्रतिबंधाबद्दल जागरूक करत आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा विराटला भडकवत आहे आणि त्यावर विराट एक विचित्र प्रतिक्रिया देत आहे.


या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा विराट कोहलीकडे पाहून “ए कोहली, कोहली चौका मार ना, ए कोहली, कोहली”, असा इशारा करताना दिसत आहे. अनुष्का शर्माचे हे शब्द ऐकून विराट कोहली एक विचित्र प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडिओ अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत असून हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.


अनुष्का शर्माने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे: मला असं वाटत आहे की विराट कोहली आजकाल क्रिकेटला खूप मिस करत आहे. कारण मैदानावरील कोट्यावधी चाहत्यांकडून त्याला खूप प्रेम मिळते. त्याने या विशिष्ट प्रकारच्या चाहत्याला देखील विशेषतः लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून मी त्याला त्याची आठवण करुन देत आहे.

Leave a Comment