या देशाची राजकुमारी कोरोनाग्रस्तांसाठी करणार हॉस्पिटलमध्ये काम

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाशी लढण्यासाठी सर्वस्तरातून लोक पुढे येत आहे. काही दिवसांपुर्वीच 2019 मिस इंग्लंडने देखील आपला मुकूट उतवरत डॉक्टर म्हणून काम करण्यास सुरूवात केली होती. आता स्वीडनच्या राजकुमारी सोफिया या देखील पुढे आल्या असून, कोरोनाशी लढण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये काम करणार आहेत.

35 वर्षीय सोफिया यांनी तीन दिवसीय ऑनलाईन ट्रेनिंग देखील घेतले असून, ज्याद्वारे त्यांना स्टॉकहोल्म येथील सोफियाहेमेट हॉस्पिटलमध्ये काम करण्याची अनुमती मिळाली.

द रॉयल सेंटरनुसार, राजकुमारी सोफीया या हॉस्पिटलमध्ये हेल्थकेअर असिस्टेंट म्हणून ज्वाईन झाल्या आहेत. त्या थेट कोव्हिड-19 रुग्णांशी थेट संपर्कात येणार नाहीत. त्या इतर कामांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करतील.

हे हॉस्पिटल दर आठवड्याला आपल्या प्रोग्रामद्वारे 80 जणांना प्रशिक्षण देत आहे. यामध्ये सफाई, किचनमधील काम, मशीन डिसइंफेक्शन करणे अशा कामांचा समावेश असतो. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कामाचे ओझे कमी होते.

सोशल मीडियावर राजकुमारी सोफिया यांचा एक फोटो व्हायरल होत असून, ज्यामध्ये त्या इतर कर्मचाऱ्यांसोबत उभ्या आहेत.

सोफिया यांचा 40 वर्षीय राजकुमार कार्ल-फिलिप यांच्याशी विवाह झाला असून, ते गादीचे चौथे वारसदार आहेत.

Leave a Comment