दिलासादायक बातमी; लवकरच 510 लोकांवर होणार लसीचे ट्रायल

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, सर्वच देश या व्हायरसवरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी लसीच्या चाचणीच्या (ट्रायल) पहिल्या टप्प्यातील तयारी पुर्ण केली आहे. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांनी पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी 510 लोकांची निवड केली आहे.

यूनिव्हर्सिटीचे प्रमूख संशोधक प्रा. एड्रियन हिल यांनी सांगितले की, ज्या लोकांची ट्रायलसाठी निवड करण्यात आली आहे त्यांचे वय 18 ते 55 वर्ष आहे.

त्यांनी सांगितले की, पुढील आठवड्यांपासून मनुष्यावर लसीचे ट्रायल केले जाईल. याआधी लसीचे ट्रायल वेगवेगळ्या प्रजातीच्या प्राण्यांवर केलेले आहे. ही लस चिम्पांझीला व्हायरसचे इंजेक्शन दिल्यानंतर तयार करण्यात आली आहे.

यामध्ये आढळून आले की व्हायरशी लढण्यामध्ये त्यांच्या शरीरात अँटीबॉडी निर्माण झाल्या. वैज्ञानिकांना आशा आहे की हे अँटीबॉडी मनुष्यामध्ये व्हायरसला नष्ट करेल. लसीचे ट्रायल यशस्वी झाल्यास सप्टेंबरपर्यंत लस वापर करण्यास उपलब्ध असेल.

डब्ल्यूएचओनुसार जगभरातील शंभर देशातील वैज्ञानिक लस बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. 70 लसींवर शोध सुरू आहे. अमेरिका आणि चीनच्या वैज्ञानिकांनी लस मनुष्यावर ट्रायल करण्यास सुरूवात देखील केली आहे.

Leave a Comment