भारतीय वैज्ञानिकांनी बनवला कोरोनामारक मास्क

जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी सीएसएमसीआरआयच्या वैज्ञानिकांनी एक खास उपाय शोधला आहे. केंद्रीय मीठ आणि सागरी रासायनिक संशोधन संस्था, गुजरातमधील वैज्ञानिकांनी असा फेस मास्क तयार केला आहे, ज्याच्या संपर्कात येताच कोरोना व्हायरस आपोआप नष्ट होतो.

संस्थेच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, संशोधित पॉलीसल्फोन मॅटेरियलद्वारे तयार करण्यात आलेल्या मास्कच्या बाहेरील थर विशेष साम्रगीने तयार करण्यात आलेला आहे. बाहेरील थर हा 150 मायक्रोमीटर जाड आहे.

हा मास्क 60 नॅनोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक कोणत्याही व्हायरसला सहज नष्ट करतो. या मास्कला वैद्यकीय मान्यता मिळालेली नाही. हा मास्क डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ऑक्सिजन सारखा असेल. यामुळे व्हायरसपासून त्यांचा बचाव होईल.

हा मास्क धुवून पुन्हा वापरण्यास देखील सोपा आहे. या मास्कची किंमत केवळ 50 रुपये आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मास्कपेक्षा बर्‍याच पटीने हा मास्क चांगला आहे. कारण त्याचे बाह्य थर बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाशी लढण्यास सक्षम आहे.

सीएसएमसीआरआयचे विज्ञान आणि पृथक्करण तंत्र विभागाचे प्रमुख डॉ. व्हीके शाही म्हणाले की हा मास्क एन-95 मास्कपेक्षा अधिक चांगला असल्याचे सिद्ध होईल. एक आठवडा मेहनत घेतल्यानंतर हा मास्क तयार करण्यात आला आहे. मंजूरी मिळताच याचा वापर करण्यास सुरूवात होईल.

Leave a Comment