देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात ४० टक्क्यांनी घट


नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेते देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात ४० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती दिली असून देशातील कोरोना रुग्णांची संख्या १००७ ने वाढत १३ हजार ३८७ झाली आहे. तर कोरोनामुळे २४ तासात २३ जणांचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली. देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. तरी देखील आपण कोरोनाचा कसोशीने सामना करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


१५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आढळलेले रुग्ण आणि १ एप्रिलपासून आजपर्यंत आढळलेले रुग्ण यांची तुलना केली असता एप्रिल महिन्यात हे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. चाचण्यांची संख्या आपण वाढवली आहे तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment