चीनचा खोटारडेपणा उघड, वुहानमध्ये मृतांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची सुरूवात चीनच्या वुहान शहरातून झाली. मात्र एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढत असताना वुहानमध्ये यावर नियंत्रण मिळवल्याचे आतापर्यंत सांगितले जात होते. मात्र आता चीनने दिलेली ही आकडेवारी खोटी असल्याचे समोर आले आहे. वुहानमधील कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पावल्यांची संख्या 50 टक्क्यांनी वाढली असून, वुहानच्या प्रशासनाने आकडेवारीमध्ये चूक झाल्याचे कबूल केले आहे.

वुहानच्या साथीच्या रोगाच्या कार्यालयाने सोशल मीडियावर सांगितले की, वुहानमध्ये आणखी 1290 जणांचा मृत्यू झाला आहे. ही प्रकरण चुकीमुळे वगळली गेली होती व त्यांची नोंद झाली नव्हती असे सांगितले जात आहे. यामुळे वुहानमधील मृत्यू झालेल्यांची संख्या 3,869 वर पोहचली आहे. चीनने लपवलेल्या या आकडेवारीमुळे पुन्हा एकदा त्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

या नवीन आकडेवारीमुळे चीनमधील मृत्यूचे प्रमाणे 39 टक्क्यांनी वाढले असून, आतापर्यंत संपुर्ण चीनमध्ये 4,632 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

या लपवलेल्या आकडेवारीमुळे पुन्हा चीनवर या व्हायरस संदर्भात प्रश्न निर्माण झाले आहेत. चीनने व्हायरस संदर्भातील माहिती आंतरराष्ट्रीय संस्थांना दिली नाही व परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

Leave a Comment