कोरोनाची अचूक माहिती देण्यासाठी WHO ने सुरू केली मेसेंजर सेवा

जगभरात थैमान घातलेले कोव्हिड-19 बाबत मोठ्या प्रमाणात चुकीची व खोटी माहिती सोशल मीडियावर पसरत आहे. ही खोटी माहिती रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) सतत प्रयत्न करत आहे.

खोटी माहिती रोखण्यासाठी आता डब्ल्यूएचओने नवीन चॅटबॉट इंटरेक्टिव्ह सर्व्हिस सादर केली आहे. ज्याद्वारे लोकांना योग्य व अचूक माहिती मिळेल.

या सेवेला स्प्रिंक्लर (Sprinklr) सोबत सादर करण्यात आले आहे. या सेवेला डब्ल्यूएचओच्या अधिकृत फेसबुक पेजद्वारे देखील वापरता येईल. यासाठी तुम्हाला डब्ल्यूएचओच्या अधिकृत फेसबुक पेजवर जावे लागेल. येथे देण्यात आलेल्या सेंड मेसेज पर्यायावर क्लिक केल्यानंतर कोव्हिड-19 संदर्भात अचूक माहिती मिळेल.

WHO Health Alert on COVID-19 is now active on Messenger 👉 messenger.com/t/WHO

Posted by World Health Organization (WHO) on Tuesday, April 14, 2020

डब्ल्यूएचओने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर या संदर्भात माहिती देत लिहिले की, डब्ल्यूएचओची हेल्थ अलर्ट सर्व्हिस लाईव्ह करण्यात आली आहे. आता युजर्स मेसेंजरवर या व्हायरस संदर्भात अचूक माहिती घेऊ शकतील.

डब्ल्यूएचओने एक लिंक देखील दिली आहे. ज्यावर क्लिक केल्यानंतर थेट डब्ल्यूओच्या मेसेंजरवर जाता येते. यानंतर गेट स्टार्टेड पर्यायावर क्लिक केल्यानंतर युजर्सला सर्व माहिती मिळेल.

याव्यतिरिक्त डब्ल्यूएचओच्या पेजवर काही टिप्स देखील देण्यात आलेल्या आहेत, ज्या व्हायरसला तुमच्यापासून लांब ठेवतील.

Leave a Comment