कोरोनाचा वाईट टप्पा पुर्ण, लवकरच अर्थव्यवस्था सुरूळीत होईल – ट्रम्प

कोरोना व्हायरस महामारीने अमेरिकेमध्ये थैमान घातले असून, जगात सर्वाधिक कोरोनाची लागण अमेरिकेतील नागरिकांना झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यामते, कोरोनाचा सर्वात वाईट टप्पा पुर्ण झाला आहे. कोरोनाच्या विरोधातील रणनिती काम करत आहे. लढाई सुरू आहे, मात्र नवीन डेटा दर्शवतो की राष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या नवीन प्रकरणांच्या बाबतीत शिखर पार केले आहे.

अर्थव्यवस्थेला पुन्हा सुरू करण्यासाठी लवकरच नवीन नियमावली जारी केली जाईल, असेही ते म्हणाले.

ट्रम्प म्हणाले की, कोरोनाच्या बाबतीतील घटनाक्रम सांगतो की आपण मजबूत स्थितीमध्ये आहोत. देशातील व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी नियमावलीला अंतिम रुप देऊ शकतो.

व्हाईट हाऊसचे कोरोना रिस्पाँस कोऑर्डिनेटर डॉ. डी ब्रिक्स म्हणाले की, 9 राज्यात जवळपास 1 हजार प्रकरण आहेत. येथून दररोज 30 पेक्षा कमी प्रकरण समोर येत आहेत. तर ट्रम्प यांच्या मते देशातील जवळपास 30 राज्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत.

ट्रम्प म्हणाले की, डब्ल्यूएचओचा निधी थांबवल्याने टीका झाली. दुसऱ्या देशांनी संघटनेला साथ दिली आणि त्यावर विश्वास दर्शवला. कोणत्याही देशाने निर्बंध लादले नाहीत. सर्वांना माहिती आहे इटली, स्पेन आणि फ्रान्समध्ये काय झाले. संघटनेकडून चूक झाली असून, याबाबत त्यांनाही माहित आहे.

याशिवाय रशियाला वेंटिलेटरची गरज असल्यास मदत केली जाईल, असेही ट्रम्प म्हणाले.

Leave a Comment