लॉकडाऊनमधून राज्य सरकारने वगळल्या या गोष्टी


मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली. आता राज्य सरकारने या लॉकडाऊनमधून काही गोष्टी वगळण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीशी निगडित वेगवेगळ्या गोष्टींना लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यात आली आहे.

सर्व प्रकारच्या माल आणि वस्तूंच्या वाहतुकीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर बसून खाण्याची व्यवस्था नसलेली मिठाईची दुकाने, नाष्टयाचे पदार्थ आणि फरसाणाची दुकाने यांनाही सूट देण्यात आली आहे. लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करण्याच्या अटींवर राज्य सरकारने दिलेली ही परवानगी देण्यात आली आहे. संस्थेचा प्रमुख आणि दुकानाच्या मालकाची या अटींचे पालन करण्याची जबाबदारी असणार आहे.

लॉकडाऊनमधून या गोष्टी वगळल्या

Leave a Comment