कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल


नवी दिल्ली : अवघे जग हे जीवघेण्या कोरोनासमोर हतबल झाले असून झपाट्याने जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होत आहे. सध्याच्या घडीला जगभरात 83 हजारांहून अधिक नवे कोरोनग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. तसेच 7 हजारांहून अधिक लोकांचा या जीवघेण्या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 20,82,372 वर पोहोचली आहे. तर या व्हायरसमुळे बळी गेलेल्यांचा आकडा 1,34,560 वर पोहोचला आहे.

अमेरिकेवर कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव झाला आहे. 6 लाखांहून अधिक लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तर 28 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादूर्भाव अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोना पाहायला मिळतो. न्यूयॉर्क शहर कोरोना व्हायरसचे केंद्र बनले आहे. याच कारणामुळे न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे.

अमेरिकेत जगभरातील सर्वाधिक कोरोना व्हायरसच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अमेरिकेमध्ये 32,58,879 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर एखादी व्यक्ती अमेरिकेत कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले तर त्याच व्यक्तीची तपासणी अनेकदा करण्यात येते. अमेरिकेनंतर जर्मनी सर्वाधिक टेस्ट करणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर्मनीमध्ये आतापर्यंत 17,28,357 कोरोना व्हायरसच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यानंतर रूस, इटली आणि यूएईचा क्रमांक येतो. येथे अनुक्रमे 15,17,992, 11,17,404, 7,67,000 कोरोना व्हायरसच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत.

चीन कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत सर्वात पुढे आहे. आतापर्यंत चीनमधील 77,816 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर चीननंतर जर्मनीमध्ये 72,600 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. याव्यतिरिक्त स्पेनमध्ये 70,853 आणि इराणमध्ये 49,933 लोक रिकव्हर झाले आहेत. तसेच अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत रिकव्हर झालेल्यांची संख्या 48,701 आहे.

Leave a Comment