देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 हजार पार; तर मृतांच्या संख्येतही वाढ


नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 12,380 पोहोचला आहे. तर देशातील 414 लोकांनी आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावला आहे. तसेच 10477 लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील 1488 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे आतापर्यंत 414 लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीत महाराष्ट्रात सर्वाधिक 187 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये 53, दिल्लीमध्ये 32 आणि गुजरातमध्ये 33 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2916 पार पोहोचला आहे. तर 187 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त 295 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीमध्ये एकूण 1578 रूग्ण समोर आले आहेत. तर 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 40 लोक ठिक झाले आहेत. तर तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 1242 रूग्ण समोर आले आहेत. तर 14 लोकांचा मृत्यू झाला असून 118 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. राजस्थानमध्ये 1023 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 147 लोक बरे झाले आहेत. मध्यप्रदेशात 987 कोरोनाचा संसर्ग झाला असून 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 64 लोक या आजारातून बरे झाले आहेत.

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची गुजरातमधील संख्या 766 एवढी आहे. तर 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त 64 लोक या आजारातून बरे झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे तेलंगणामध्ये 647 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 120 लोक बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने देशामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या 170 जिल्ह्यांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. याव्यतिरिक्त संसर्गाचा धोका असणारे 207 जिल्हे चिन्हित केले असून हे हॉटस्पॉट नाहीत. परंतु, संसर्गाचा धोका पाहून त्याठिकाणी हॉटस्पॉट घोषित केला जाऊ शकतो. तसेच देशात कम्युनिटी ट्रान्सफरचा धोका नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment