पाकिस्तानचा आपल्याच नागरिकांसोबत भेदभाव, केवळ श्रींमतानाच आणले ब्रिटनवरून परत

जगभरातील इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानमध्ये देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र अशा स्थितीत देखील पाकिस्तान आपल्याच नागरिकांमध्ये भेदभाव करताना दिसत आहे.

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सच्या एका स्पेशल प्लाइट लंडनवरून जवळपास 150 व्हीआयपी लोकांना घेऊन इस्लामाबादला आली. मात्र 400 सर्वसामान्य नागरिक अजूनही ब्रिटनमध्ये अडकले असून, त्यांच्या परत येण्याची कोणतीही सुविधा नाही. खास गोष्ट म्हणजे स्पेशल प्लाईटमध्ये सोशल डिस्टेंसिंग पाळण्यासाठी सीट रिकामे ठेवण्यात आले होते.

पाकिस्तानच्या जिओ टिव्हीच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या एका मंत्र्याचे कुटुंब आणि 150 व्हीआयपींना लवकरात लवकर लंडन सोडायचे होते. त्यांच्यासाठी 9 एप्रिलला लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून इस्लाबाद येथे येण्यासाठी खास प्लाइटची सोय करण्यात आली. लंडनमध्ये अडकलेल्या सर्व सामान्यांना परत आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.

पाकिस्तानच्या हाय कमिशनने देखील मान्य केले की पीआयएला त्याच लोकांची यादी देण्यात आली होती, ज्यांच्या नावाची शिफारस पीआयएचे मुख्य कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली होती. पाकिस्तान सरकारला या घटनेवरून टीकेचा सामना करावा लागत आहे.

पाकिस्तानने आपली एअरस्पेस 21 मार्चपासून बंद केली आहे. ब्रिटनमध्ये अडकलेले पाकिस्तानी काही दिवसांसाठीच गेले होते. मात्र विमानसेवा बंद झाल्याने तेथे तेथेच अडकले.

Leave a Comment