लॉकडाउन हे कोरोना व्हायरसवरील औषध नाही – राहुल गांधी


नवी दिल्ली – लॉकाडाउन हे कोरोना व्हायरसवरील नसून हा व्हायरस लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा डोके वर काढणार आहे. कारण व्हायरसला लॉकडाउन फक्त काही वेळासाठी रोखतो, चाचणी हा एकमेव मार्ग आहे त्यातून आपल्याला व्हायरस कुठल्या दिशेला चालला याची माहिती होते असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, अन्न-धान्यांचा मोठया प्रमाणावर आपल्याला गोदामामध्ये साठा आहे. डाळी, साखर, तांदूळ, गहू हे दर आठवडयाला गरीबांपर्यंत पोहोचवले पाहिजे. तसेच मोदींच्या चूका मी कोरोना व्हायरसला आपण जेव्हा पराभूत करु त्या दिवशी सांगेन. आता कोरोना विरुद्धची लढाई सुरु झाली आहे. आताच विजय मिळवला हे जाहीर करणे चुकीचे ठरेल. आपल्याला दीर्घकाळ लढाई लढावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान कोरोनाचा व्हायरस नियंत्रित होत नाही, त्याचे व्यवस्थापन करावे लागते. लॉकडाउन ठेवायचा की, नाही हे प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ठरवू दे. तुम्ही एखादा विभाग सुरु केल्यानंतर चाचण्या पुरेशा प्रमाणात झाल्या नसतील तर व्हायरसच्या फैलावामुळे पुन्हा लॉकडाउन करावे लागेल.

कोरोनामुळे देशात वाढणाऱ्या बेरोजगारी भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले, देशात दुसऱ्यांदा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. पण यानंतर आधीच बेरोजगारीच्या संकटाशी झगडणाऱ्या आपल्या देशाला याच बेरोजगारीच्या आणखी मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. केंद्राने त्यासाठी पॅकेज जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली. सध्या सरकारने काय केले नाही, काय करायला हवे होते यावर चर्चा करण्याची वेळ नाही. सध्या कोरोनाच्या संकटाचा एकजुटीने सामना करायला हवा, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आगामी काळात आपल्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड तणाव येणार आहे. तरी देखील आपल्याला या संकटाचा सामना करावाच लागणार आहे. सध्याच्या घडीला माणसाचे आयुष्य वाचणे ही सगळ्यात मोठी गरज आहे. मात्र त्याचवेळी व्हायरस आपली अर्थव्यवस्था नष्ट करणार नाही, याची देखील काळजी आत्तापासून सरकारने घ्यायला हवी, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले.

उद्योग-व्यवसायाचे रणनिती आखून विभाग सुरु करावा. तसेच हॉटस्पॉटसमधील कोरोनाग्रस्तांची ओळख पटवण्यासाठी चाचण्यांचा स्पीड वाढवा. बेरोजगारी वाढणार, आर्थिक भार वाढणार त्यामुळे आर्थिक व्यवस्थापन करण्याची आवश्यकता. राज्यांना काही अधिकार देण्याची आवश्यकता असल्याची मागणी देखील यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे.

ज्या गतीने आर्थिक मदत पोहोचयला पाहिजे त्या गतिने मदत पोहोचत नाही. गरीबांसाठी अन्नवाटप सुरु करा, गरीबांच्या खात्यात पैसा जमा करा, कारण आगामी काळात बरोजगारी येणार आहे. छोटया मध्यम उद्योगांच्या सुरक्षेसाठी पॅकेज तयार करावी. रणनिती आखून कोरोनाच्या चाचण्या करा, जास्तीत जास्त चाचण्या करा, चाचण्यांची संख्या वाढवा, सध्या चाचण्यांचे प्रमाण खूप कमी आहे आणि सध्या रणनितीनुसार चाचण्या सुरु नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांनी आणि लोकांनी कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे तरच या संकटावर मात करणे शक्य असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment