अखेर भारताला चीनकडून घ्यावे लागले रॅपिड टेस्टिंग किट्स


नवी दिल्ली – कोरोना व्हायरसची चाचणी सामग्री चीनमधून आज भारतात दाखल होऊ शकते. रॅपिड टेस्टिंग किटचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. कोरोनाच्या चाचण्या या किट्समुळे जलदगतीने करणे शक्य होणार आहे. आज चीनमधून सामानाची पहिली डिलिव्हरी होणार आहे. तीन लाख रॅपिड टेस्टिंग किट्स त्यामध्ये असणार आहेत.

या किट्सच्या निर्यातीला चीनकडून बराच विलंब झाला असून चीनमधून पुढच्या दोन आठवडयात असे आणखी २० ते ३० लाख किट्स भारतात पाठवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. जगातील काही देशांमध्ये खराब दर्जामुळे चीनी किट्सना नकार देण्यात आल्यानंतर निर्यातयोग्य आणि किट्सची दर्जात्मक चाचणी झालेल्या कंपन्यांची यादी चीन सरकारने तयार केली.

त्याचबरोबर चीनच्या कस्टम विभागानेही किट्सच्या क्वालिटी टेस्टिंगचा आग्रह धरल्यामुळे हे किट्स भारतात पोहोचायला उशीर झाला. या रॅपिड टेस्टिंग किटसचा वापर कोरोना संसर्गाचे प्रमाण जास्त असलेल्या हॉटस्पॉटच्या भागात करण्यात येणार आहे.

Leave a Comment