कोरोना : अमिरात एअरलाईन्सने प्रवाशांसाठी सुरू केली रॅपिड चाचणी

अमिरात एअरलाईन्सने आपल्या प्रवाशांची अवघ्या 10 मिनिटात कोरोना व्हायरस रक्तचाचणी करण्यास सुरूवात केली आहे. जे प्रवासी दुबईवरून रवाना होतील अशांची ही रॅपिड चाचणी केली जाईल. एखाद्या एअरलाईन्सने सुरू केलेली ही अशा प्रकारची पहिलीच चाचणी आहे.

एअरलाईनने या महिन्याच्या सुरूवातीला मर्यादीत प्रवाशांसह आपली सेवा सुरू केली होती. ज्या परदेशी प्रवाशांना आपल्या देशात जायचे आहे, अशांसाठी सेवा सुरू आहे. मात्र कोणताही इतर प्रवासी देशात येऊ शकणार नाही.

एअरलाईनने सांगितले की, दुबईवर ट्युनिशियाला जाणाऱ्या सर्व प्रवाशांची कोव्हिड-19 चाचणी करण्यात आली. अमिरात पहिली एअरलाईन आहे, जी विमानतळावरच प्रवाशांची चाचणी करते.

ही चाचणी दुबई आरोग्य अधिकाऱ्यांकडून केली जाते व याचे रिझल्ट अवघ्या 10 मिनिटांमध्ये येतात. चाचणी क्षमता वाढवणार असल्याचे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी आदेल अल-रेधा यांनी सांगितले. प्रत्येक उड्डाणानंतर विमानाची साफसफाई आणि डिसइनफेक्शन केले जाते.

Leave a Comment