कोरोना : लुडो खेळताना खोकला म्हणून मित्रानेच घातली गोळी

कोरोना व्हायरसमुळे सार्वजनिक ठिकाणी न कळत खोकणे, शिंकणे देखील भयानक झाले आहे. ग्रेटर नोएडा येथील 25 वर्षीय व्यक्ती लुडो खेळत असताना खोकल्याने मित्रांनी त्याला गोळी घातल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, मित्रांनी केला आहे.

ग्रेटर नोएडा येथील दयानगर गावात चारजण लुडो खेळत असताना ही घटना घडली. दुखापतग्रस्त प्रशांत सिंहला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तो आता धोक्यातून बाहेर आला आहे. आरोपी जय वीर सिंह उर्फ गुल्लूला अद्याप पकडण्यात आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनुसार, प्रशांत आणि आणखी तिघे जण गावातच लुडो खेळत असताना गुल्लू तेथे आला. मात्र प्रशांत खोकल्यामुळे त्याच्यावर व गुल्लूमध्या वादावादी सुरू झाली. प्रशांतने संसर्ग पसरविण्यासाठी असे जाणूनबुझून केले असे वाटल्याने गुल्लूला राग आला. या भाडंणात गुल्लने प्रशांतला गोळी घातली.

प्रशांतला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave a Comment