लॉकडाऊनमध्ये बुक केलेल्या विमान तिकिटांचे मिळणार रिफंड

लॉकडाऊनच्या काळात बुकिंग करण्यात आलेल्या सर्व विमानांच्या तिकिटाचे ग्राहकांना रद्द करण्याची विनंती केल्यास 3 आठवड्यांच्या आत रिफंड करण्यात यावे, असे आदेश नागरी उड्डाण संचालनालय एअरलाईन्सला दिले आहेत. यासोबतच कोणतीही कँसलेशन फी घेतली जाणार नाही.

लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेल्या सर्व स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय तिकीट बुकिंगसाठी हे आदेश आहेत. अनेक खाजगी एअरलाईन्सनी ग्राहकांना रिफंड देण्यास नकार देत, रिशेड्युल करण्याचा पर्याय दिला होता. यानंतर अनेक ग्राहक संघटनांनी तक्रार केली होती.

भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा 22 मार्च आणि घरगुती विमानसेवा 25 मार्चपासून बंद केलेली आहे. एअर इंडिया वगळता अनेक एअरलाईन्सने 14 एप्रिलनंतर घरगुती उड्डाणासाठी बुकिंग सुरू केले होते. मात्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवल्याने नागरी उड्डाण संचालनालयाने सर्व विमानसेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

खाजगी एअरलाईन्सचे म्हणणे आहे की, ते ग्राहकांना रिफंड न देता मोफत रिशेड्युल करण्याची ऑफर देत आहेत. मात्र नंतर रि-बुकिंगच्या वेळी शुल्क आकारले जाईल.

Leave a Comment