एकाच दिवसात पालघरमध्ये आढळले 10 नवे कोरोनाग्रस्त


पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नव्हता. पण काल (15 एप्रिल) रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना चाचणीचा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. पालघर तालुक्यातील आठ नागरिकांना तर डहाणू तालुक्यात वैद्यकीय सेवेत असलेल्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोरोनाची बाधा पालघर तालुक्यातील काटाळे या गावी वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील तीन वर्षीय मुलीला झाली होती. पण त्या मुलीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा आणि येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. तिच्या संपर्कात आलेल्या 82 जणांचे रिपोर्ट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पण त्या मुलीच्या संपर्कात आलेल्या सात जणांना कोरोनाची लागण झाली. पाच नवीन रुग्ण काटाळे येथील वीट भट्टी परिसरात आढळले असून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना (इंटर्न) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. तर कोरोनाची लागण सफाळे भागातील तीन जणांनाही झाल्याचे समोर आहे. पण हे रुग्ण मुलीच्या संपर्कातील नाही.

Leave a Comment