करोना लढाई – हिरो कॉर्पने दान दिल्या ६० मोबाईल अँब्युलन्स


फोटो साभार स्पार्क
देशातील करोना संक्रमित रुग्णांची वाढत चाललेली संख्या लक्षात घेऊन गरजूंना हॉस्पिटल मध्ये पोहोचविणे व उपचारात कोणताही अडचण येऊ नये अथवा उशीर होऊ नये या उद्देशाने हिरो मोटो कॉर्पने एक आदर्श देणगी दिली आहे. त्यांनी करोना विरुध्दच्या लढाईत ६० मोबाईल अँब्युलन्स देणगी म्हणून दिल्या असून देशातील विविध भागात त्या पोहोचविल्या जात आहेत. या अँब्युलन्स त्या त्या भागातील नागरिकांना सेवा देतील.

मोबाईल अँब्युलन्सची खास बात म्हणजे ही चालवायला अगदी सोपी आहेच पण अरुंद गल्ल्या, कच्चे रस्ते यावरून व्यवस्थित प्रवास करू शकते. या अँब्युलन्सना साईड कारही आहे. त्यात रुग्णाला बसवून प्रथमोपचार करता येतात. अथवा रुग्णाला झोपवून नेता येते. या अँब्युलन्स बाईक चे इंजिन १९९.६ सीसीचे एअरकुल्ड तंत्रज्ञान वापरलेले आहे. ही बाईक वेगळ्या प्रकारे कस्टमाइज केली गेली आहे शिवाय त्यात ऑक्सिजन सिलिंडर, फर्स्ट एड किट, फायर एक्स्टींविशर अशी काही उपकरणे जोडली गेली आहेत.

या मोबाईल अँब्युलन्ससाठी हिरो एक्स्ट्रीम २०० आर बाईकचा वापर केला गेला असून ती बीएस ६ नॉर्मला अनुरूप आहे.

Leave a Comment