राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 2684 वर


मुंबई : राज्यात काल दिवसभरात 350 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2684 वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 11 जण मुंबईत, 4 पुण्यात तर तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 178 जणांचा मृत्यू झाला आहे.

कालपर्यंत राज्यातील पाठवण्यात आलेल्या 46 हजार 588 नमुन्यांपैकी 42 हजार 808 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत; तर 2684 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 67 हजार 701 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 5647 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 259 कोरोनाबाधित रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरूष तर 7 महिला आहेत. त्यातील 5 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 11 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 18 रुग्णांपैकी 13 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार होते. तर रुग्णांपैकी एकाला कर्करोग तर एकाला क्षयरोग होता.

Leave a Comment