टाटा स्काय ब्रॉडबँडच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये मोठा बदल

कोरोना व्हायरस महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण घरून काम करत आहेत. अशा स्थितीत ब्रॉडबँड कंपन्या आणि टेलीकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना वर्क फ्रॉमसाठी अनेक सुविधा देत आहेत. मात्र आता टाटा स्कायने आपल्या ब्रॉडबँडच्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

टाटा स्कायचे दोन प्रकारचे प्लॅन आहेत. त्यातील एक लिमिटेड आणि दुसरा अनलिमिटेड आहे. मात्र आता टाटा स्कायने अनलिमिटेड प्लॅनमध्ये काही अटी जोडल्या आहेत.

कंपनीने अनलिमिटेड प्लॅनमध्ये बदल करत 1,500 जीबी डेटा वापरल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 2 एमबीपीएस केला आहे. आधी अनलिमिटेड प्लॅनसाठी अशी कोणतीही अट नव्हती.

टाटा स्काय ब्रॉडब्रँडकडे 4 प्रकारचे प्लॅन आहेत. ज्यात मासिक, तीन महिने, सहा महिने आणि 12 महिन्यांच्या प्लॅनचा समावेश आहे. कंपनीच्या प्लॅनची सुरूवात 900 रुपयांपासून असून, सुरूवातीचा इंटरनेट स्पीड 25 एमबीपीएसपासून ते 100 एमबीपीएस एवढा आहे.

Leave a Comment