कोरोना : एकेकाळी विरोध करणाऱ्या देशांना भारत पाठवत आहे औषध

कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध प्रभावी ठरत असल्याचे सांगत आहे. भारतात या औषधाचे सर्वाधिक उत्पादन होत असल्याने भारत अनेक देशांना या औषधाचे निर्यात करत आहे. विशेष गोष्ट म्हणजे जे देश आतापर्यंत भारताचा विरोध करत होते, त्यांना देखील भारत औषध पाठवत आहेत. संकटाच्या काळात भारत या देशांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

या देशांच्या यादीत मलेशियाचा देखील समावेश आहे. मलेशियाने नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि काश्मिरमधील कलम 370 हटवल्यानंतर विरोध केला होता.

ब्रिटन, चीन, ईराण, मलेशिया आणि टर्की सारक्या देशांनी कलम 370 हटवल्याचा विरोध केला होता. मलेशिया, टर्की, बांगलादेश या देशांनी नागरिकत्व कायदाला विरोध केला होता. ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनीमध्ये या विरोधात प्रदर्शन झाले होते. मात्र आता याच देशांच्या मदतीसाठी भारत पुढे आला आहे.

भारत कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी फायदेशीर असणारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध अमेरिका, ब्रिटन, स्पेन, जर्मनी, रशिया, यूएई, जॉर्डन, युंगाडा, कुवैत आणि मलेशिया या देशांना पाठवत आहे.

भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन सोबतच या देशांना पॅरोसिटामॉल देखील निर्यात करत आहे. याच्या बदल्यात भारत या देशांकडून एन 95 मास्क, वेंटिलेटर्स, पीपीई सुट्स मागत आहे.

Leave a Comment