भारतातील वटवाघळांच्या 2 प्रजातींमध्ये ‘बॅट कोरोना व्हायरस’ – ICMR

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग वटवाघळांमधून मनुष्यात पोहचल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता भारतीय संशोधकांना केरळ, हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू येथील वटवाघळांच्या 2 प्रजातींमध्ये वेगळ्या प्रकारचे बॅट कोरोना व्हायरस आढळले आहेत. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे.

पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी संस्थेत वैज्ञानिक आणि या रिसर्चच्या मुख्य लेखिका डॉ. प्रज्ञा डी. यादव यांनी सांगितले की, या गोष्टीचा कोणताही पुरावा नाही की हा बॅट कोरोना व्हायरस मनुष्यामध्ये आजाराचे कारण ठरू शकतो.

केरळ, हिमाचल, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या रोजेत्तुस आणि टेरोपस प्रजातीच्या 25 वटवाघूळ बॅक कोव व्हायरसने पॉझिटिव्ह आढळले.
यादव यांनी सांगितले की, बॅट कोरोना व्हायरसचा कोव्हिड-19 महामारीशी काहीही संबंध नाही. टेरोपस प्रजातीच्या वटवाघळांमध्ये 2018 आणि 2019 मध्ये केरळध्ये निपाह व्हायरस आढळला होता.

या रिसर्चनुसार, वाटवाघळांमध्ये नैसर्गिकरित्याच अनेक व्हायरस असतात, जे मनुष्याला आजारी पाडू शकतात.

Leave a Comment