अखेर पुण्यातील 28 परिसर टाळेबंद


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. केंद्र तसेच राज्य सरकारकडून वारंवार आवाहन करूनही अनेक शहरांमध्ये अजूनही लॉकडाऊनला गांभीर्याने घेतले जात नाही. आता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये कठोर पावले उचलली जाणार आहेत. आज सकाळपासून पुण्यातील 16 पोलिस स्थानकाच्या हद्दीतील आणखी 28 परिसर सील करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून सर्वात जास्त कोरानाग्रस्त मुंबई आणि पुण्यात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासनाने पुणेकरांच्या आरोग्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

या आधीच पुण्यातील 4 पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पाच परिसर सील करण्यात आले होते. आता आणखी 28 परिसर सील करण्यात येणार असल्यामुळे लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. महापालिका आयुक्तांनी सोमवारी पुण्यातील काही परिसर सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे दिला होता. पण महापालिका आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावामध्ये आणखी काही परिसरांची वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. त्यानुसार आजपासून हे परिसर सील करण्यात येणार आहे. या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

Leave a Comment