आरोग्य सेतूने रचला विक्रम, 13 दिवसात 5 कोटी वेळा डाऊनलोड

केंद्र सरकारने कोरोनाग्रस्तांना ट्रॅक करण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅप काही दिवसांपुर्वी लाँच केले होते. या अ‍ॅपने एक नवीन विक्रम केला आहे. अवघ्या 13 दिवसांमध्ये या अ‍ॅपला 5 कोटींपेक्षा अधिक जणांना डाऊनलोड केले आहे. यासोबतच हे अ‍ॅप जगातील सर्वाधिक डाऊनलोड केले गेलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत आले आहे. या बाबतची माहिती नीति आयोगाच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

नीति आयोगाच्या रिपोर्टनुसार, आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपला 13 दिवसांमध्ये 5 कोटी लोकांनी डाऊनलोड केले आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधन केले त्याच्या 24 तासांच्या आत 11 मिलियन युजर्सनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते.

आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपने पोकेमॉन गो गेमिंग अ‍ॅपचा विक्रम देखील देखील मोडला आहे. 2016 मध्ये पोकेमॉन गो अ‍ॅपला 19 दिवसात 50 मिलियन युजर्सने डाऊनलोड केले होते.

दरम्यान, आरोग्य सेतू अ‍ॅप युजर्स कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आला आहे की नाही याची माहिती देते. हे अ‍ॅप हिंदी, इंग्रजी आणि मराठीसह 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment