अमेरिकेत कोरोनाचा हैदोस ! मागील 24 तासांत 2 हजार 228 लोकांचा मृत्यू


वॉशिंग्टन : सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसशी जगभरातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका लढत असून मागील 24 तासात अमेरिकेतील 2 हजार 228 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या एका दिवसांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा हा सर्वाधिक आकडा आहे. देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्याही सर्वाधिक आहे.

यासंदर्भात वेबसाइट वर्ल्डओमीटरने दिलेल्या माहिनीतनुसार, कोरोना बाधितांची अमेरिकेतील संख्या 6 लाख 13 हजार 886 वर पोहोचली असून यापैकी 5 लाख 49 हजार 19 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 13 हजार 473 लोकांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत 26 हजार 47 लोकांचा देशात मृत्यू झाला आहे. वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेमध्ये आतापर्यंत 38 हजार 820 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

अमेरिकेतील 26 हजार 47 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त न्यूयॉर्क शहरात असून न्यूयॉर्कमधील 10 हजार 834 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्याही सर्वाधिक असून आतापर्यंत 2 लाख 3 हजार 123 लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा जगभरातील आकडा वाढून जवळपास 20 लाखांवर पोहोचला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे संसर्ग झालेल्यांचा एकूण आकडा 19 लाख 98 हजार 111 आहे. तर 1 लाख 26 हजार 604 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये 1 लाख 74 हजार 60 कोरोना बाधितांची संख्या आहे. तर मृतांच्या आकड्यामध्ये अमेरिकेनंतर इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 21 हजार 67 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 18 हजार 255 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment