राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2334 वर, मुंबईत आढळले 242 रुग्ण


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेची बाब असून काल दिवसभरात राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 352 ने वाढ झाली आहे. या नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2334 झाली आहे. काल एका दिवसात मुंबईत सर्वाधिक 242 रुग्ण आढळले आहेत. तर पुणे महापालिका क्षेत्रात 39 रुग्ण आढळले आहेत, तर मालेगावात 14 रुग्ण आढळले आहेत.

काल राज्यातील 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक 9 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील मृतांची संख्या 101 वर पोहोचली आहे. तर पिंपरी-चिंचवड आणि मीरा-भाईंदरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी 50 जण कोरोना बाधित आढळले आहेत.

Leave a Comment