राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अडीच हजारांवर; एकट्या मुंबईत 1632 रूग्ण


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात आज आणखी भर पडली असून राज्यातील कोरोनाग्रस्तांमध्ये 121 रुग्णांची भर पडल्याचे समोर आल्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2 हजार 455 एवढी झाली आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यापैकी मुंबई 92, नवी मुंबई 13, रायगड 1, ठाणे 10 आणि वसई-विरारमध्ये 5 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून या व्यक्तींपैकी 50 जण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले आहे. यापैकी लातूरमध्ये 8, यवतमाळ येथे 7, बुलढाणा जिल्ह्यात 6 , मुंबईत 14 तर प्रत्येकी 2 जण पुणे ,पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील 6 जण अहमदनगर येथे तर 1 जण पिंपरी चिंचवड येथे कोरोना बाधित आढळले आहेत.

Leave a Comment