लॉकडाऊन : या देशात चक्क एटीएमद्वारे मिळत आहेत मोफत तांदूळ

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. यामुळे नागरिकांच्या जेवणाची समस्या निर्माण झाली आहे, तर काहीजणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. अशातच एका देशाने गरजू लोकांच्या मदतीसाठी एक वेगळा मार्ग निवडला आहे.

व्हिएतनाममध्ये लोकांना अन्नाची समस्या निर्माण होऊ नये यासाठी राइस एटीएम अर्थात तांदळाचे एटीएम लावण्यात आले आहेत. या एटीएमद्वारे कोणीही बँकेचे कार्ड वापरून मोफत तांदूळ काढू शकते. हे राइस एटीएम 24 तास सुरू असते.

व्हिएतनामचे उद्योगपती होआंग तुआन यांनी गरजूंसाठी हे अभियान सुरू केले. जेणेकरून लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत मिळेल. याचा चांगला परिणाम देखील पाहण्यास मिळत आहे.

व्हिएतनाममध्ये 31 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे येथील छोटे उद्योग बंद झाले आहेत. हजारो लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

गुयेन थी नावाच्या महिलेने सांगितले की, राइस एटीएम खूपच फायदेशीर ठरत आहे. तांदळाची एक पिशवी दिवसभर पुरते. आमचे शेजारी देखील आम्हाला शिल्लक राहिलेले जेवण देतात. नाहीतर आम्ही नुडल्स खाऊन पोट भरतो. गुयेन यांना 3 मुले असून, लॉकडाऊनमुळे त्यांच्या पतीची नोकरी गेली आहे.

या एटीएममधून 1.5 किलो तांदूळ निघते. हे मशीन हनोई, ह्यू आणि दानंग सारख्या मोठ्या शहरांमध्ये लावण्यात आलेले आहे.

Leave a Comment