हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रिलायन्स फाउंडेशन देणार जादा वेतन


नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. जादा वेतनासह इतर फायदे आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले जाणार असल्याची माहिती रिलायन्सकडून देण्यात आली. कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी मुंबईतील सर एचनएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. एक महिन्याचा सीटीसी त्यांनी जादा दिला जाणार असून सेवन हिल्स हॉस्पिटल, इमर्जन्सी रूम आणि दोन आयसोलेशन रुममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त वेतनाशिवाय जास्तीचे पैसे दिले जाणार आहेत.

सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकाऱी ज्ञानचंदानी यांनी याबाबत एक पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले की, आरएफएचमधील सर्व टीमचे आम्ही आभार मानतो. तुम्ही कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात एकत्र होऊन काम करत आहात. आपण सर्वजण खरे योद्धे आणि रिअल हिरो आहात. आम्हाला तुमच्या या कर्तव्यनिष्ठेचा आणि संकटकाळात दिलेल्या या आधाराचा अभिमान आहे. तुम्ही याकाळात खासकरून सेव्हन हिल्स आणि इआर आयसोलेशन युनिटमधील टीमने एकनिष्ठेने काम केले.

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न आणि त्यांच्या या कामाचे कौतुक म्हणून हे एक गिफ्ट दिले जात असल्याचे ज्ञानचंदानी म्हणाले. आपण सर्वजण सध्याच्या या कठीण काळात अविरत काम करत आहेत. याचे कौतुक आणि कृतज्ञता म्हणूनच एक महिन्याचे जादा वेतन दिले जाणार आहे. सेव्हन हिल्स, ईआर आणि दोन आयसोलेशन रुममध्ये जोखमीचे काम असलेल्या ठिकाणी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना जादाच्या वेतनाशिवाय अधिक रक्कम देण्याचा निर्णय़ घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment