मदतीच्या नावाखाली चमकेगिरी करणाऱ्यांवर राज ठाकरे नाराज


मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सर्वच क्षेत्रातील आर्थिक स्थिती चिंताजनक होत चालली असून देशभरात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाउनच्या कालावधीत पंतप्रधान मोदी यांच्याकडून वाढ करण्यात आल्यामुळे आता आणखी काही देशातील नागरिकांना घरातच राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट भरणाऱ्या आणि घरापासून दूर अडकलेल्यांना मदत करण्यासाठी लाखो हात समोर आले आहेत. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ही मदत करताना होत असलेल्या चुकीच्या कृतिवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारबरोबरच राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, पक्षांचे कार्यकर्ते लॉकडाउनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. हे सगळेजण आपल्यापरीने वेगवेगळ्या स्वरूपात मदत करत असून, याविषयी राज ठाकरे यांनी एका निवेदन प्रसिद्ध करत कौतुक केले आहे. त्याचबरोबर ही मदत करत असताना कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या प्रसिद्धीच्या प्रयत्नांवर बोट ठेवले आहे.
या बाबत राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेले निवेदन

Leave a Comment