कोरोना : फॉल्स नेगेटिव्ह टेस्ट चिंतेचा विषय

जगभरातील वैज्ञानिकांनुसार कोरोना व्हायरसविरुध्दच्या लढ्यात फॉल्स नेगेटिव्ह रिपोर्ट मोठी समस्या ठरत आहेत. अशा रिपोर्टचा अर्थ, ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे मात्र अनेकदा चाचणीमध्ये त्याची माहिती मिळत नाही. वैज्ञानिकांनुसार, कोव्हिड-19 च्या बदलणाऱ्या स्ट्रेननुसार कोणतीही चाचणी 100 टक्के एकदम अचूक नाही.

अचूक चाचणी करण्यासाठी प्रशिक्षित असणे आणि सॅम्पलिंग दरम्यान देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच अमेरिकेत कोरोनाच्या चाचणीसाठी प्रशिक्षित फार्मासिस्टची नियुक्ती केली जात आहे.

चाचणीनंतर देखील लक्षण न दिसण्यामागची 3 कारणे –

नमुने चुकीच्या पद्धतीने घेणे –

मेयो क्लिनिकच्या तज्ञांनुसार, शरीरात व्हायरस किती पसरला आहे यावर चाचणीमध्ये लक्षण समजतात. याशिवाय लक्षण समजण्यास दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची ठरते ती म्हणजे चाचणीचे नमुने कशापद्धतीने घेण्यात आलेले आहे. घशातून स्वॅब नमुने घेताना विशेष सावधगिरी बाळगली आहे की नाही ? नमुने लॅबपर्यंत पोहचण्यास किती वेळ लागला ? या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

व्हायरस एका भागातून दुसऱ्या भागात पोहचणे –

वैज्ञानिकांनुसार, कोरोना व्हायरसचे संक्रमण हळूहळू वाढते. व्हायरस शरीराच्या नाक, तोडांतून फुफ्फुसापर्यंत पोहचतो. या स्थितीमध्ये कोरोना शरीरात असताना देखील स्वॅप नमुना नेगेटिव्ह येतो. लक्षण दिसत असल्यास तीन वेळा स्वॅब नमुने घेतले जातात. याशिवाय रुग्णाच्या फुफ्फुसाचे देखील नमुने घेतले जातात. फुफ्फुसाचे सॅम्पल घेण्यास ब्रॉकोएल्विओलर प्रक्रिया म्हणतात. यात शरीरात लहानशी चीर मारून फुफ्फुसामधून फ्लूड काढले जाते.

चाचणी अचूक नसणे –

तज्ञांनुसार, चाचणी मोठ्या स्तरावर होत असल्याने अनेकदा आवश्यक सावधगिरी बाळगली जात नाही. अमेरिकेत फार्मासिस्टची नियुक्ती करण्यात आली आहे. धोकादायक गोष्टी अशी की लोकांची चाचणी नेगेटिव्ह आल्याने ते अनेकांना भेटण्यास सुरूवात करतात.

वैज्ञानिकांना आशा आहे की, सीरोलॉजिकल चाचणी फायदेशीर ठरेल. या चाचणीमध्ये शरीरातील अँटीबॉडीज कोरोना व्हायरसवर कशाप्रकारे परिणाम करतात हे पाहिले जाते. याआधी संक्रमण झाले होते की नाही हे देखील या चाचणीद्वारे समजेल. रुग्णाचा रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यास सीरोलॉजिकल चाचणी केली जाईल.

Leave a Comment