कोरोनाशी लढण्यासाठी गुगलने लाँच केले खास फीचर्स

कोरोना व्हायरस संदर्भात नागरिकांना योग्य माहिती मिळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. गुगलने देखील भारतातील युजर्सला कोरोना व्हायरसची खरी व विश्वसनीय माहिती मिळावी यासाठी वेबसाईट सुरू केली आहे. याशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्यान मंत्रालयाद्वारे मिळणारी माहिती सर्च इंजिन आणि युट्यूबवर नागरिकांसाठी उपलब्ध असेल.

गुगल मॅप्स आणि सर्च इंजिनवर 3 डझन पेक्षा अधिक शहरातील 1500 खाद्य आणि नाईट शेल्टरची माहिती गरजूंसाठी उपलब्ध आहे. युजर्स गुगल असिस्टेंटला हिंदी अथवा इंग्रजीमध्ये “food shelters” असे विचारात लोकेशनची माहिती मिळवू शकतात.

गुगलने कोव्हिड-19 कम्युनिटी मोबिलिटी रिपोर्ट देखील पब्लिश केला असून, कंपनीनुसार, आरोग्य अधिकाऱ्यांना यामुळे निर्णय घेण्यास मदत होईल. या रिपोर्टमध्ये सार्वजनिक ठिकाण जसे की पार्किंग, स्टेशन्स आणि किराणा दुकानातील वाहतूक कशी बदलली आहे, हे सांगितले आहे.

युट्यूब आणि सर्च इंजिन टॉप न्यूज स्टोरीजमध्ये कोरोना संदर्भातील माहिती देत आहे. याशिवाय युट्यूबच्या होमपेजवर कोरोना व्हायरस न्यूज शेल्फ फीचर देखील दिले आहे.

Leave a Comment