कोरोना: आग्रा मॉडेलची विशेष चर्चा, मात्र रुग्णांचा आकडा परत वाढला

कोरोनाशी लढण्यासाठी आग्रा मॉडेलची विशेष चर्चा झाली. मात्र आता पुन्हा एकदा येथील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. आग्रामध्ये मागील 24 तासात 30 नवे रुग्ण आढळले आहेत. येथील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 134 झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी कोरोनाशी लढण्यासाठी आग्रा मॉडेल पुर्ण देशाने फॉलो करावे असे म्हटले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी येथे 12 नवीन रुग्ण आढळले.

जे नवीन रुग्ण समोर येत आहेत त्यातील एका खाजगी हॉस्पिटलच्या संपर्कात आलेले अधिक आहेत. या हॉस्पिटलमधून 16 कोरोनाची प्रकरण समोर आली आहेत. या हॉस्पिटलमध्ये हाथरस, अलीगढ आणि फिरोजाबाद येथून देखील रुग्ण येतात. मात्र हॉस्पिटलकडे त्यांची काहीही माहिती नाही.

हॉस्पिटलमध्ये एक 65 वर्षीय महिला किडनीचा आजार असल्याने भरती झाली होती. त्यानंतर महिलेला मथूराच्या नयती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले, जेथे तिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर पारस हॉस्पिटल सील करण्यात आले. रुग्णांना सोडण्यात आले आहे. येथे दररोज 250 ते 300 रुग्ण येतात. कर्मचारी देखील इतर ठिकाणी जातात. महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आतापर्यंत 16 जणांना संसर्ग झाला आहे. हॉस्पिटलला क्वारंटाईन सेंटर बनविण्यात आले आहे.

आग्रामध्ये सर्वात प्रथम 3 मार्चला इटलीवरून परतलेल्या कुटुंबातील 6 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर प्रशासनाने परदेशातून आलेल्यांपैकी 336 सॅपल घेतले, ज्यातील 11 जणांना लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर प्रशासनाने परदेशातून आलेल्या नागरिकांची यादी बनवत संक्रमित झालेल्यांच्या नातेवाईकांपासून ते संपर्कात आलेल्या सर्वांना क्वांरटाईन केले.

आग्रामध्ये संक्रमण रोखण्यासाठी क्लस्टर रणनितीची 2 मार्चपासून सुरूवात झाली. यात एपिसेंटर 1 आणि 2 अंतर्गत 3 किमीमध्ये कंटेनमेंट आणि 5 किमीमध्ये बफर झोन बनवण्यात आले. प्रत्येक केसची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. यासाठी 2 सदस्यांची 1248 टीम तयार करण्यात आल्या होत्या. पुर्ण भागात 1.6 लाख घरात जाऊन 9,90,691 लोकांची चाचणी करण्यात आली.

कोरोनाशी लढ्यात सरकारतर्फे आग्रा मॉडेलचे कौतूक केले जात आहे. मात्र रुग्णांची संख्या 100 च्या वर केल्याने चूक कोठे झाली, असा प्रश्न विचारल जात आहे.

Leave a Comment